logo

वाढदिवस साजरा न करता आम्रपाली बुद्ध विहार येथील वाचनालयात पुस्तके दिली भेट वर्धा (महाराष्ट्र) : आम्रपाली बुध्द येथ

वाढदिवस साजरा न करता आम्रपाली बुद्ध विहार येथील वाचनालयात पुस्तके दिली भेट

वर्धा (महाराष्ट्र) : आम्रपाली बुध्द येथे वाचनालयाची सुरु करण्यात आलेली असुन वार्ड मधील रहीवासी चार वर्षीय श्राव्या आशिष पाटील ह्या बालिकेचा वाढदिवस साजरा न करता वाचनालयात पुस्तके भेट देत वाढदिवस साजरा करण्यात आला हा सामाजिक उपक्रम त्याचे आजोबा कवी के पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आल्याचे त्यानी सांगितले, वाढदिवसात लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा त्याचा कुठे तरी चांगला उपयोग व्हावा यासाठी त्यानी शाहू ,फुले,आंबेडकर विचारांची पुस्तके विविध वाचनालयात भेट देत अनोखा उपक्रम पाटील परिवारा तर्फे राबविण्यात येत असल्याचे सांगितले , त्याच बरोबर प्रस्तावना मांडताना विक्रम थुल यांनी सांगितले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व समाजाला पटवुन दिले. प्रत्येक गरजू विद्यार्थाला सोयी सुविधायुक्त अभ्यासिकेत निशुल्क अभ्यास करता यावा या करीता आम्ही वॉर्ड मधील सर्व युवकांनी हा उपक्रमला आम्रपाली बुद्ध विहारात सुरुवात केली त्यासाठी आम्हाला विविध मंडळी सहकार्य व मार्गदर्शनही करत आहे , त्याचबरोबर शिक्षणाचे महत्व सांगताना आशिष सोनटक्के म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक आघाडीचे शैक्षणिक विचारवंत होते. त्यांचे शैक्षणिक विचार आणि शैक्षणिक योगदान महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक कारकीर्द सुद्धा अतिशय भव्य व प्रेरक आहे. त्यांनी शिक्षणासाठी घेतलेले परिश्रम, संपादित केलेल्या अत्युच्च शैक्षणिक पदव्या आणि त्यातून त्यांनी कमावलेली असामान्य व कुशाग्र बुद्धिमत्ता या गोष्टी आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. आज आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य आणि योगदान चे महत्त्व समजून त्याच्या शैक्षणिक समजून घेतले पाहिजे ,गाव तिथे विहार, विहार तिथे वाचनालय तयार करावे असे त्यानी बोलताना सांगितले , तेव्हा अनुप मानकर ,विक्की पाटील ,लेखी शंकर ,के पाटील साहेब ,मोरेश्वर सहारे,प्रणित मानकर,आशिष पाटील,राहुल पाटील,राजेंद्र भुजाडे, आशिष गाजरे, शंकर ढवळे,मधुकर गायकवाड, अनुप थुल,संदेश वाघमारे,मयूर मेश्राम ,अमोल फुलझेले,प्रज्ञा सोनटक्के, कविता मानकर, इत्यादी लोकांनी सहकार्य केली.

18
4971 views
  
1 shares